Pune News : पुणे : पुणे ते दौंड दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे-लोणावळा लोकलच्या धर्तीवर आता पुणे-दौंड लोकल सेवा लवकरच सुरू केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या एका महिन्याच्या आत पुणे विभागाला इलेक्ट्रिक मल्टीपल युनिटचे (ईएमयू) दोन रेक मिळणार आहेत. काही दिवस याची चाचणी घेतल्यानंतर पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू करण्याला हिरवा कंदिल मिळणार आहे.
आता डेमूला करा बाय बाय…
पुणे-लोणावळा दरम्यान सध्या लोकल सेवा सुरू आहे. याच धर्तीवर पुणे-दौंड दरम्यान लोकल सेवा अद्याप सुरू केलेली नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांची गैरसोय होत होती. पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून पुणे दौंड लोकल सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. (Pune News ) या पार्श्वभूमीवर प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद उबाळे यांनी सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पुणे दौंड रेल्वे सेवा या विषयावर भेट घेऊन चर्चा केली.
या भेटीदरम्यान, उबाळे यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, येत्या एका महिन्याच्या आत पुणे विभागाला इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) चे दोन रेक मिळणार आहेत. हे रेक आल्यानंतर त्याची चाचणी होईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर दोन टप्प्यात पुणे ते दौंड अशी लोकल रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. मुंबई विभागाकडून पुणे विभागाला सुरूवातीला दोन ईएमयू रेक मिळणार आहेत. (Pune News ) त्याची चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला दोन त्यानंतर तीन रेक येणार आहेत. येत्या दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही लोकल सेवा वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनेला दिली आहे.
याविषयी माहिती देताना पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे म्हणाले की, दौंड दरम्यान ईएमयू सेवेची या महिन्याअखेरपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये काय अडचणी येतात, कोणत्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी केली जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गौतमी पाटीलचे कोल्हापुरातील कार्यक्रम अचानक रद्द; चाहत्यांना धक्का
Pune News : कयानीचा मावा केक अन् चितळेंच्या बाकरवडीवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब!
Pune News : लाडका बाप्पा आला अन् हाताला हंगामी रोजगार मिळाला