Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News:पुण्यात फडणवीसांच्या हस्ते 60 हून अधिक प्रकल्पांचे भूमिपूजन; 3000 कोटींचं पॅकेज, पुण्यासाठी 5 मेगा प्रोजेक्ट, वाचा भाजपचा मास्टर प्लॅन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 December 2025, 17:42
Pune News: Fadnavis lays foundation stone for more than 60 projects in Pune; Rs 3000 crore package, 5 mega projects for Pune, read BJP's master plan

पुणे: आगामी पुणे महापालिका (Pune News) निवडणुकांचे बिगुल लवकरच (Devendra Fadanavis) वाजण्याची शक्यता असून, त्याआधी सत्ताधारी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच विकासकामांचा धडाका उडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहरात तब्बल 3000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन एकाच दिवशी करण्यात येणार असून, उद्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. (Breaking News)

पुण्यात 60 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर येथे सुरू असलेले हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे उद्घाटन किंवा नवीन कामांची घोषणा करता येत नाही. त्यामुळे ही संधी हातातून जाऊ नये म्हणून भाजपकडून सोमवारी गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील 60 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. (Marathi News)

पायाभूत सुविधांवर भर

या कार्यक्रमात पुणे शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करणाऱ्या अनेक मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी 842 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 450 कोटींच्या 20 नवीन पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्था, तसेच पुणेकरांच्या सुरक्षेसाठी 53 कोटींचे अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर यांचा समावेश आहे. आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन नवीन विंग्ससाठी 130 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

वाहतुकीसाठी उपाययोजना

याशिवाय सायकलस्वारांसाठी 145 कोटींचा जागतिक दर्जाचा सायकल ट्रॅक, खराडी, बाणेर आणि चांदणी चौक येथे 25 कोटींची तीन नवीन अग्निशमन केंद्रे, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत आणि इतर सांडपाणी प्रकल्पही या यादीत आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठ चौक आणि बिंदू माधव चौक येथील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

 

पुणेकरांना दिलासा

अमृत-2 योजनेअंतर्गत वडगाव येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी 200 कोटी, शेवाळवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 35 कोटी आणि केशवनगर-मुंढवा भागातील पाणीपुरवठा जाळ्यासाठी 27 कोटी असे एकूण 413 कोटींचे नवे प्रकल्पही यावेळी मार्गी लावले जाणार आहेत. या मोठ्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे आणि पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47
Next Post
Pune Crime: Shocking revelation from the police in the case of the brutal murder of a cousin due to an immoral relationship in Pune...

Pimpri Murder Case: 'मीच मोठा डॉन'...वर्चस्वाच्या वादातून रक्तरंजित खेळ, पिंपरीत सराईत गुन्हेगाराची हत्या, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp