Pune News : शिरूर, ता. २७ व्रत व उपवासाला केळी खाण्यासाठी मागणी वाढलेली असते. पण या वर्षी पावसाने उघडीप दिल्याने केळीचे दर वाढले असून सर्वसामान्यांना उपवासासाठी लागणारी केळी ६० रूपये डझन झाली आहेत. केळी च्या दरवाढीने यावर्षी श्रावण महिण्यात केळीचे दर गगणाला भिडणार आहेत. पावसाने उघडीप दिल्याने केळीच्या बागा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक व व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. (Pune News)
श्रावण महिण्यात केळीचे दर गगणाला भिडणार…
केळी या पिकाची महत्वाची लागवड ही जून महिण्याची असते. वर्षभर केळीचे उत्पादन होत असल्याने शेतकरी या पिकासाठी चांगली महेनत करतो. या वर्षी पाऊसाने उघडीप दिल्याने पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टॅंकर व विहिरीचा वापर करून केळीच्या बागेचे व्यवस्थापन केले. मात्र पुणे जिल्ह्यात केळी बागांचे व्यवस्थापन झाले नाही. त्यामुळे बाग सुकून जाण्याचे प्रकार वाढले. त्यातून मोठ्या प्रमाणात केळी च्या बागा नष्ट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
या काळात व्यापारी मोठ्या प्रमाणात केळीची खरेदी करत असतात. मात्र या वर्षी केळी खरेदी करताना या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागले आहे. (Pune News)
साधारण दरवर्षी १० रूपये पासून ते १५ रूपयांपर्यंत प्रती किलो च्या बाजारभावाने कच्ची केळी व्यापारी खरेदी करतात. त्यातून भट्टी लावून पिकून केळी सर्वसाधारण २० ते ३० रूपये प्रति डझन केळी विकताना दिसतात. (Pune News)
दरम्यान, या वर्षी पाऊस लांबल्याने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी च्या बागा उद्धवस्त झाल्या आहे. त्यामुळे बाजारात मागणी असून आवक घटली आहे. त्यामुळे सध्या २० रूपये प्रतिकिलो केळी व्यापाऱ्यांना विकत घ्यावी लागत आहे. त्यातून वाहतूक व पिकविण्याचा खर्च वाढला असल्याने सध्या केळी ६०, ५०, ४० रूपये प्रतिडझन ने बाजारात विकली जात आहे. (Pune News) सध्या वाढलेल्या या दरामुळे ग्राहकांना केळी महागड्या स्वरूपात विकत घ्याव्या लागत आहे.
पुढील महिणा हा श्रावणाचा असून या काळात व्रत व उपवासाला लागणारी केळी महागणार आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातून महागडी कच्ची विकत घ्यावी लागत आहे. भविष्यात महाग केळी खरेदी केल्याने महागडी केळी नागरिकांना विकत घ्यावी लागणार असल्याचे कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील मोरया फ्रुट कंपनीचे मालक विशाल गावडे यांनी सांगितले आहे. .