Pune News पुणे, : शहरातील पाषाण येथील संजय गांधी वसाहतीत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शरद होनमाने आणि त्यांचे सहकारी 24 एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास पाषाण परिसरातील संजय गांधी वसाहतीत गस्त घालत होते. यावेळी वसाहतीमध्ये काही लोकांमध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा वाद मिटवण्यासाठी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी होनमाने पुढे सरसावले. Pune News

पोलीस कायदेशीर प्रक्रिया करत असतानाच, तिथल्या आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात आरोपींनी पोलीस हवालदार होनमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांवरच हात उचलल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शरद होनमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Pune News

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी वडगाव शेरी परिसरात दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, आरोपींना पोलीस चौकीत नेल्यानंतर त्यांनी तिथेही तोडफोड करून गोंधळ घातला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस दलात संताप व्यक्त केला जात आहे. Pune News
पाषाण येथील घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येळे करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. Pune News






