पुणे – कोरोना काळात रद्द करण्यात आलेली मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोचमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरु करताना तिला विस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे. ही गाडी २५ जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, प्रगती एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबईत सकाळी 11.25 वाजता पोहोचेल, तर परतीच्या प्रवासासाठी ती सीएसएमटीहून संध्याकाळी 4.25 वाजता सुटेल आणि पुण्याला संध्याकाळी 7.50 वाजता पोहोचेल.
25 जुलैपासून संध्याकाळी साडे चार वाजता ही ट्रेन सुटेल आणि पुण्यात संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.तर पुण्यातून सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि ती मुंबईत 11.25 मिनिटांनी पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल.या गाडीचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे.
तसेच, प्रगती एक्स्प्रेस ही डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेसनंतर मुंबई-पुणे मार्गावरील तिसरी रेल्वे असून, जी व्हिस्टाडोम कोचसह धावेल आणि चौथी सीआर नेटवर्कवर आहे, कारण मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस देखील धावते.
मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसमध्ये, व्हिस्टाडोम कोचमध्ये 180-डिग्री फिरता येण्याजोग्या आलिशान जागा, मोठ्या काचेच्या खिडक्या, अँटी-ग्लेअर स्क्रीनसह काचेचे छप्पर आणि प्रवाशांना अधिक माहिती देण्यासाठी वाय-फाय-आधारित प्रणाली आहे.