पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वारगेट एस टी स्टँड आवारात ही घटना घडली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये ओढून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. ही सर्व घटना मंगळवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून रात्रीच एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
स्वारगेट परिसरात नेहमीच प्रवाशांची तसेच बसेसची वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा संतापजनक प्रकार घडल्याचे बोललं जात आहे. रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला संशयित आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.