(Pune Airport )पुणे : विमानतळावर २४ वर्षीय तरुणीने सीआयएसएफ महिला निरीक्षकाच्या हाताला चावा घेऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. १२) संध्याकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे.
विमानतळ पोलिसांनी केली अटक…!
गुंजन अगरवाल (वय – २४ असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर सीआयएसएफ निरीक्षक रुपाली ठोके (वय- ३९) असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपाली ठोके यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल तरुणीने टॅक्सीमधून प्रवास करुन विमानतळावर पोहोचल्यावर तिने टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली. यावेळी टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगरवाल हिने लुल्ला यांना शिवीगाळ केली तसेच विमानतळ प्रस्थान गेट क्रमांक १ वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.
विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रुपाली ठोके यांना निदर्शनास आले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी तरुणीने रुपाली ठोके यांचं काही न ऐकता त्यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी तरुणीने ठोके यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली. या घटनेमुळे रात्री राडा घातल्यामुळे विमानतळ परिसरात काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन!
Vaduj News : वडुज येथे जन औषधी दिन, महिला दिन व मनसे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न!