केडगाव: भरधाव पीएमपी (Pune Accident) बसने बसथांब्यावरून चाललेल्या ट्रॅक्टरला धडक (Pune News) दिल्याची घटना वाघोली-पारगाव (Pune Crime) रस्त्यावरील हांडे वॉशिंग सेंटर या थांब्यावर घडली. दुपारच्या सुमारास श्रीनाथ म्हसोबा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असताना पीएमपी बसने थांब्यावर थांबण्यासाठी बस थांबवताना कंट्रोल न झाल्याने बसच्या मागील बाजूला जोरदार धडक बसली. (Wagholi Accident)

धडकेची तीव्रता इतकी होती की, अक्षरशः बसच्या काचांचा चुराडा झाला आहे. या अपघातात प्रवासी कुठल्याही प्रकारे जखमी झाले नाहीत. सदर घटनेनंतर उपस्थित प्रवाशांनी अन् स्थानिक नागरिकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या कारभारावर संकोच व्यक्त केला आहे. बसचे वाहक अन् चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अद्याप कोणतीही ठोस भूमिका पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्याकडून घेतली जात नाही. (Breaking News)

वाघोली ते पारगाव या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अन् अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने अनेक अपघात या ठिकाणी होतात. अवजड वाहने दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रशासनाने जागोजागी पडलेल्या खड्डयावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांनी तसेच स्थानिकांनी व्यक्त केली.

भगवानला गमवावा लागला जीव
मागील सहा महिन्यापूर्वी याच महामार्गावर राहू रस्त्याच्या कडेने पायी जात असताना भगवान रघुनाथ उशीर वय 30 या तरुणाला भरधाव बसने जागीच चिरडले. हा अपघात वाघोली- पारगाव रस्त्यावरील देवकरवाडी (ता. दौंड) येथील हॉटेल अक्षय गार्डन नजिक लकडे वस्ती येथे घडला होता.






