लहू चव्हाण
पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने या वर्षी स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावल्याने शहराचा डंका देशभरात पोहचला.
महाराष्ट्र पर्यटन विभागाने घेऊन तरुण भारत व पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा,यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा सोहळा मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नुकताच दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयामार्फत स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छतेमध्ये पाचगणी नगरपालिका प्रथम क्रमांकाने गौरवली गेली होती.
जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी व पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यासह पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रालयातर्फे पाचगणीला गौरवण्यात आले होते.त्यानंतरच या सर्व घटनांची दखल घेत महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्यामार्फत दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण देशात प्रथम क्रमांक आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेर यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात स्वच्छ सर्वेक्षण पाचगणी चा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. याचे सर्व श्रेय पाचगणीच्या जनतेला आहे. पाचगणीचे सर्व नगरसेवक यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.व पाचगणीच्या जनतेने दिलेले सहकार्य व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये केलेली मोलाची कामगिरी त्यामुळेच पाचगणी केंद्रात व राज्यात गौरवली गेली. अशी भावनिक प्रतिक्रिया पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.