Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके आदी पर्यटनस्थळ परिसरात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 4 July 2024, 19:39

 पुणे : धोकादायक ठिकाणी वर्षाविहार करण्यासाठी जाणारे पर्यटक आपल्या जीवाची काळजी घेताना दिसत नाहीत. अशातच भुशी धरणावर घडलेली दुर्घटना बघता प्रशासन अलर्टर झाले आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली,जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव, खेड तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाळा सुरू असल्याने बहुतांश ठिकाणी धबधबे तयार झाले आहेत. तसेच भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वर्षाविहार पर्यटनासाठी येत असतात. सुट्टीच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून तसेच मुंबई शहर व पुणे शहरातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, अशावेळी वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत.

मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली’ (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉईंट, टाटा धरण, लायन्स पॉईंट, खंडाळा, सहारा ब्रीज, राजमाची पॉईंट, पवना धरण, घुबड तलाव परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह, पाण्याचे धबधबे, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटींग क्षेत्रात हे आदेश लागू असणार आहे.

या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध असणार आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य वाहतूक करणे, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, मद्य बाळगणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.

सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, डिजे यंत्रणा वाजविणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनांना अनुमती असेल.

या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ऑपरेशन सिंदूरवर आधारित सुखविंदर सिंग यांचे “सिंदूर” नावाचे नवीन गाणे रिलीज

Thursday, 22 May 2025, 9:16

राज्यावर चक्रीवादळाचे संकट, किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 22 May 2025, 8:33

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३२ वर; जाणून घ्या तज्ञांचे मत

Thursday, 22 May 2025, 8:16

पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 22 May 2025, 7:54

आज ‘या’ राशींनी कृतीस प्राधान्य दिल्यास अनेक प्रश्न सुटणार, नवीन संधी येणार चालून

Thursday, 22 May 2025, 7:35

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53
Next Post

दौंडच्या केमिस्ट बांधवांनी केली वारकऱ्यांची आगळीवेगळी सेवा..; वारकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.