पुणे : १ नोव्हेंबर पासून, विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात नफा जमा होत नाही, तोपर्यंत अनिश्चित काळासाठी सीएनजी सेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर आज शुक्रवारी (ता.१४) बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व तीन ओएमसी (एचपीसी, तीओसी, बीपीसीएल) आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालकांसह पीडीए व सह जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. यावेळी वरील निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
या बैठकीत पीडीए पुणे तर्फे सविस्तर निवेदन करण्यात आले. सुनावणीच्या शेवटी माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले की टोरेंट गॅसने एमओपीएनजीच्या परिपत्रकानुसार सीएनजी डीलर्स यांना लवकरात लवकर पैसे द्यावे. अन्यथा त्यामुळे कोणताही संप झाला तर प्रथम टोरेंटला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पीडीए पुणे यांचे २० तारखे पासून बेदमुत सीएनजी विक्रीचे संप पुढे ढकलण्यात आले आहे. १ नोव्हेंबर पासून, विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जमा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी सीएनजी सेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दिवाळी असल्याने नागरिकांची व ग्राहकांची गैरसोय होईल हे लक्षात घेऊन संप पुढे ढकलण्याची विनंती जिल्हाधिकारी आणि ओएमसी यांच्याकडून करण्यात आली होती.