उरुळी कांचन (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय बाजीराव भोसले यांची तर उपाध्यक्षपदी चारुशीला उमेश सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष राजेंद्र शिंदे व उपाध्यक्ष बबई काकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोसायटीच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निर्णय अधिकारी कनिष्ठ लिपिक अधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे येथील सोनाली देसाई यांनी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक ताराचंद कोलते, सरपंच मंगेश कानकाटे, उद्योजक बापुसाहेब शितोळे, विलास कानकाटे, जयसिंग भोसले, बबनराव कोलते, शरद शितोळे, बबनराव भोसले, प्रा विजय कानकाटे, विठ्ठल कोलते, माजी उपसरपंच नारायण शिंदे, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेश भोसले, प्रमोद बोधे, संभाजी शितोळे, अंकुश कड, लोकेश कानकाटे, सुरेश काकडे, गणेश शितोळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मुकिंदा काकडे, अशोक कारंडे, समाधान अवचट, सचिव संतोष चौधरी, शहाजी शेलार, जितेंद्र पवार, सचिव हनुमंत जगताप, स्विकृत संचालक बाळासाहेब कड, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भोसले म्हणाले की, “आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा देणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.