Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Prashant Gawali: दामदुप्पटीचे स्वप्न चूर, हजारो नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी, समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी दुबईला पसार?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 11 December 2025, 17:52
Prashant Gawali : पुणे, ता. 11 : हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी (Prashant Gawali) हे मागील चार दिवसांपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधत आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आमिष दाखवत आहे. गुन्हा दाखल केला तर तुमचे पैसे मिळणार नाही. असे सांगत आहे.
परंतु. त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या गुंतवणूकदारांसह पोलीस अधिकारी, पत्रकार, चिटफंड एजंटांना धमकी वजा इशारा देत आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल प्रशांत गवळी इथेच आहे. मात्र तो करोडो रुपयांची माया घेऊन अगोदरच दुबईत पळून गेला आहे. अशी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. (Pune News)

हेही वाचा- पुणे आयुक्तांचा आदेश, कदमवाकवस्ती येथील अवैध धंद्याचे अड्डे पोलिसांकडून उध्वस्त

समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी व संचालक सुदामा दास, प्रकाश मांगने, नागनाथ जाधव, प्रकाश राठोड, ज्योतिबा काटकर, ओंकार कदम व चंद्रकांत राऊत यांनी शेतकऱ्यांना शेतमाल एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली 4 ते 5 हजार कोटी रुपयांची बेकायदा रक्कम गोळा केली. गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविल्याने पुण्यासह राज्यातील 12 हून अधिक जिल्ह्यातील 40 ते 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदार या फसवणुकीत अडकले आहे.

प्रशांत गवळी याने गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे तीनदा आश्वासने दिली होती. परंतु, कंपनी दिवाळखोरीत गेल्याने गुंतवणूकदारांना मागील पाच महिन्यांपासून एक दमडीही मिळालेली नाही. संतप्त झालेल्या गुंतवणूकदरांनी संस्थचे हडपसर येथील कार्यालय देखील फोडले आहे. गवळी याने पहिले काही दिवस गुंतवणूकदारांना धमक्या देऊन आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. जर तो इथेच असता तर तो नागरिकांना सापडला असता ना. गवळी कोणालाही दिसत नसल्याने इन्फिनिटी प्रकरणाप्रमाणे तो ही दुबईत पळून गेल्याची दाट शक्यता आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, संस्थाचालक आणि संचालक मंडळ हे सर्वजन एका माळेचे मनी आहेत. गुंतवणूकदारांना वेगवेगळे प्रलोभने दाखवितात. आणि ठराविक रक्कम गोळा होईपर्यंत थांबतात. ठराविक रकमेचा आकडा गोळा झाल्यानंतर गुंतवणूकदारांना सांगतात मार्केट डाऊन आहे. तांत्रिक अडचणी आल्या आहेत. पुढच्या महिन्यात देऊ असे सांगतात. असे म्हणून वेळ मारून नेतात. परंतु, आता आपला भांडाफोड होणार आहे? असे लक्षात आल्यानंतर पुन्हा वायदा करून चालढकल करतात. आणि यादरम्यान मिळालेल्या संधीचे सोने साधत आपला पैसा दुसऱ्या संस्थेत वर्ग करतात. आणि सर्वात प्रथम संस्थाचालक परदेशात फरार होतो.

हे प्रकरण आता इथेच थांबत नाही. कारण या घोटाळ्यात आता संचालक मंडळ हे संस्थाचालकाने मला फसवलं. असे म्हणून एकमेकांच्या विरोधात भांडतात. गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवतात. परंतु, त्यांची ती स्ट्रॅटर्जी असते. परंतु, ते सद्यस्थितीत ठरल्याप्रमाणे पळून जाण्याच्या तयारीत असतात. तर त्यातील काही संचालक गाशा गुंडाळून पळून गेलेले असतात. सर्वांनी फोन बंद केला आहे कारण आपण जर सापडलो तर आपल्याकडून सर्व गुंतवणूकदार पैसे वसूल करतील. किंवा आपला कायमचा काटा निघणार त्यामुळे संचालक मंडळही एकापाठोपाठ विदेशात पळून जाणार आहेत.

गुंतवणूकदारांच्या पैशावर पाणी

मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदार संस्थाचालक प्रशांत गवळी, संचालक व एजंट लोकांशी संपर्क करून किमान मुद्दल मागण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ते गुंतवणूकदारांना तुमची मुद्दल देण्यासाठी कंपनी पॉलिसीनुसार दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे असे भासवित होते. मात्र दोन महिने झाल्यानंतर जेव्हा गुंतवणूकदार परत मुद्दलच्या संदर्भात चौकशी करत होते. तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा पुढच्या तारीख मिळाव्या. परंतु, त्यांना एक छदामही मिळाला नाही. अशा प्रकारचा गुंतवणूकदारांसोबत खेळ खेळल्याने त्याच्या हजारो कोटी रुपयांवर पाणी पडले आहे.

एजंट होणार बळीचा बकरा

गुंतवणूकदार संबंधित संस्थेच्या एजंट लोकांच्या घरी जात आहेत. पैसे मागत आहेत. परंतु, या संस्थेच्या भूलभुलैय्यामध्ये एजंटही फसलेले आहेत. गुंतवणूकदार सध्या पोलीस ठाण्यात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात संबंधित कंपनीचे संचालक आणि एजंट यांच्या विरोधात तक्रार देतील. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. परंतु संचालकमंडळ हे आधीच देश सोडून पळालेले असते. त्यामुळे या घोटाळ्यात एजंट हा बळीचा बकरा ठरतो आणि पोलिसांचा ससेमिरा एजंटच्या मागे लागतो. दरम्यान, गुंतवणूकदरांचा दबाव व पोलिसांच्या ससेमिराला कंटाळून श्रीगोंदा येथील इन्फिनिटी बिकनच्या प्रकरणात एका एजंटने आत्महत्या सुद्धा केली आहे. त्यामुळे समर्थ क्रॉप केअरमधील एजंटसुद्धा लवकर बळीचा बकरा होणार हे मात्र निश्चित आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

Anil Kalelkar Passes Away: मनोरंजनविश्वात शोककळा! ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp