सागर घरत
करमाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरतवाडी ता.करमाळा या शाळेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी प्रांजल प्रकाश कुटे हिने 132/150 पैकी गुण संपादन करून मंथन परीक्षेमध्ये राज्यामध्ये दहावा क्रमांक व विभागामध्ये पाचवा क्रमांक मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घरतवाडी या शाळेच्या गुणवत्तेचा डंका वाजवला आहे.
या उज्वल यशासाठी मार्गदर्शक शिक्षक प्रशांत थाटे व महेश आरडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल घरतवाडी ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.