Pradip Kand : उरुळी कांचन, (पुणे) : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष “प्रदीप दादांच्या नशिबात नक्की आमदारकी लिहिलेली आहे. ती कुठल्या रूपाने मिळायची, हे आगामी काळच ठरवेल,” असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. Pradip Kand
प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे भाकीत केले आहे. यामुळे प्रदीप कंद समर्थकांमध्ये नवा उत्साह भरला आहे. Pradip Kand
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी प्रदीप कंद यांच्या पक्षनिष्ठेचे तोंडभरून कौतुक केले. पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जर प्रदीप दादांनी दुसऱ्या पक्षात जाणे मान्य केले असते, तर ते आज आमदार म्हणून सभागृहात दिसले असते. मात्र, “हे तिकीट भारतीय जनता पक्षाला मिळणार असेल, तरच मी उमेदवारी करेन,” ही त्यांची भूमिका पक्षनिष्ठेचे एक मोठे उदाहरण आहे, असेही त्यांनी नमूद केले. Pradip Kand
प्रदीप कंद यांच्या कार्याचा आढावा घेताना पाटील यांनी त्यांच्या नावामागे असलेल्या पदांच्या मोठ्या साखळीचा उल्लेख केला. जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक अशा विविध भूमिकांमधून कंद यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान पक्के केले आहे, असे असेही पाटील म्हणाले. Pradip Kand
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्याला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीत प्रदीप कंद यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एका संधीचे सोने झाले नसले तरी, आगामी काळात त्यांच्या नशिबातील आमदारकी कोणत्या रूपाने समोर येईल, याची आता चर्चा रंगू लागली आहे. Pradip Kand







