गणेश सूळ
Postman News : केडगाव : वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने वाडेकर वस्ती, हडपसर येथील ९५ गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील एवढ्या वह्यांचे मोफत वाटप केले. देऊ तन-मन-धन।। फेडू समाजाचे ऋण। कणभरी।। या भावनेतून पोस्टमन गवळी गेली चार वर्षे हा उपक्रम अविरतपणे राबवत आहेत.(Postman News)
पोस्टमन नामदेव गवळी यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले.
पोस्टमन नामदेव गवळी यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, काही दानशूर मंडळी त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत असत. या उपकारांची जाणीव त्यांनी सतत मनात ठेवली होती. (Postman News)देणाऱ्याकडून दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे. कवी विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे… हे वचन मनी बाळगून, उपकारातून उतराई होण्यासाठी पोस्टमन गवळी हा विधायक उपक्रम दरवर्षी राबवतात.
नामदेव गवळी हे गेली आठ वर्षे वाघोली येथे पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. ते एक मुक्तहस्त लेखक देखील आहेत. पत्र वाटताना येणारे अनुभव ते ‘किस्से पोस्टमन’चे या सदरात लिहितात. पत्र वाटपाबरोबरच ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. लोकांना पोस्टाची पर्यायाने पोस्टकार्डची आठवण राहावी, यासाठी ते लोकांना दरवर्षी एक हजार पत्रे लिहितात. सामाजिक बांधिलकी जपणारे गवळी पोस्टाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे करतात.(Postman News)
गडकिल्ल्यांची आवड असणारे गवळी दर रविवारी न चुकता एक किल्ला सर करतात. वृक्षारोपणाचे आवाहन करण्यासाठी दरवर्षी दोन हजार पत्रे लिहितात. परिसरातील सिक्युरिटीजना रक्षाबंधनाला स्वखर्चातून राख्या वाटतात. (Postman News)आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य पुरवतात. एवढेच नव्हे तर वृद्धांना आणि गर्भवती महिलांना मोफत घरपोच सेवा पुरवतात.
आधी केले, मग सांगितले… या उक्तीप्रमाणे गवळी यांचे हे दातृत्वाचे व्रत अखंड चाली आहे. गवळी यांना या उपक्रमासाठी उषा राऊत तसेच अक्षय ढोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.(Postman News)
छायाचित्र
पोस्टमन नामदेव गवळी व मित्रपरिवाराकडून ९५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.