पुणे : पोस्ट ऑफिस ही एक प्रमुख संस्था आहे जी लिफाफे, पोस्ट कार्ड, मनी ऑर्डर आणि व्यापारी मालासह व्यक्तींनी सबमिट केलेले पॅकेज वितरीत करण्यासाठी जबाबदार आहे. ते टपाल तिकीट आणि पोस्टकार्ड म्हणून सेवा देण्याव्यतिरिक्त बचत योजना, पेन्शन कार्यक्रम आणि लॉकर म्हणून देखील काम करतात. त्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोस्टाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. असे प्रतिपादन पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी केले आहे.
भारत सरकारच्या वित्तीय समावेशन योजनेअंतर्गत “कुंड” गावामध्ये शाखा डाकघराचे उद्घाटन पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक डाकघर बी पी एरंडे यांच्या हस्ते आज शनिवारी (ता.१९) करण्यात आले. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन बाळकृष्ण एरंडे यांनी केले आहे. यावेळी डाकघर भोर उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक नाजनीन पठाण, सरपंच भगवान बांधल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना एरंडे म्हणाले की, भारत सरकार द्वारे पाच किलो मीटरच्या परिघामध्ये जर बँक किंवा कोणतीही आर्थिक पतसंस्था नसेल तेथे आर्थिक सेवा पुरविण्याकरता टपाल कार्यालयाची स्थापना केली जाईल. त्या अंतर्गत पुणे ग्रामीण टपाल विभागामध्ये एकूण ११ नवीन शाखा डाकघरांना उघडण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. त्या ११ शाखा डाक घरामध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.
हजारो किलोमीटर दूर असलेल्या आणि अजूनही संदेश आणि वस्तू पाठवण्याचे साधन नसलेल्या ठिकाणी पोस्ट ऑफिस दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. टपाल विभागाच्या सर्व बचत योजना सामान्य जनतेसाठी कश्या फायदेशीर आहेत, तसेच सरकार द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सबसिडी टपाल विभागाद्वारे वितरित केल्या जातात. असे एरंडे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीनगर मुख्यालयाचे सहाय्यक अधीक्षक एस.डी.मोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रमोद उबरहंडे यांनी मानले.