Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : वर्षभरापुर्वीच्या दोन”सख्ख्या शाळकरी बहिणीं”च्या बळीनंतरही, “महामार्गावरील समस्या जैसे थे”.. पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या समस्या सोडविण्यासाठी आनखी किती बळीची गरज, नागरीकांचा संतप्त सवाल.

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Saturday, 19 August 2023, 20:02

लोणी काळभोर (पुणे)- हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोणी स्टेशन चौकात वर्षभरापुर्वी झालेल्या अपघातात कवडीपाट येथील दोन “सख्ख्या शाळकरी बहिणीं”चा मृत्यू झाला होता.  या अपघातास व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्या दोन बहिणींच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या “समस्या” वर्षभराचा कालावधी उलटुन गेल्यानंतरही “जैसे थे” च असल्याचे दिसुन येत आहे.

लोणी स्टेशन चौकातील वरील अपघातानंतर शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अपघाताची तत्काळ दखल घेत, पुणे-सोलापुर महामार्गावर पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यानचे अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वाहतुक पोलीस यंत्रणा व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या होत्या. मात्र सुचना केल्यापासुन एक वर्षाचा कालावधी उलटुन गेल्या नंतरही पुणे-सोलापूर महामार्गावर अपघाताला निमत्रंण देणाऱ्या समस्या कायम असल्याचे चित्र आजही दिसुन येत आहे. खासदार, आमदार साहेबांनी दिलेली मोठमोठी आश्वासने फोल ठरली आहेत.

दरम्यान, लोणी स्टेशन चौकात वर्षभरापुर्वी ( २० ऑगष्ट २०२२ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास) झालेल्या अपघातात कवडीपाट येथील गायत्री नंदकुमार शितोळे (वय.१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय.१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यु झाला होता. गायत्री हि लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. तर लहान बहिण राजश्री हि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती.

लोणी स्टेशन येथील अपघातानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या टीकेची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वाहतुक पोलीस यंत्रणा व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या होत्या. मात्र १ वर्ष उलटल्यानंतरही पुणे-सोलापूर महामार्गावरील समस्या कायमच आहेत. त्यामुळे खासदार, आमदार साहेबांनी दिलेली मोठमोठी आश्वासने फोल ठरली आहेत.

 

अपघातानंतर बरोबर आज शनिवारी (ता. १९) पुणे-सोलापुर महामार्गावर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या टप्प्यात “पुणे प्राईम न्यूज” ने पाहणी केली असता, वाहतुक कोंडीबरोबरच, छोट्या-मोठ्या अपघाताला कारणीभुत ठरणारे सर्वच घटक आजही जैसे थे असल्याचे आढळुन आले. लोणी काळभोरसाठी स्वतंत्र चाळीसच्या आसपास वाहतूक पोलिस असतांनाही, वाहतूक पोलिस, पठाणी वसुलीत दंग असल्याने, आजही चौकाचौकात वाहतुकीची कोंडी होणे ही बाब पुर्व हवेलीमधील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली असावी अशी परिस्थिती दिसुन आली.

महामार्ग व सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग…!

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे महार्गावर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग केलेली  असल्याने आतापर्यंत अनेक अपघातही या ठिकाणी घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्क केली जात आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावरील वर्षभरानंतरही कायम असलेल्या समस्या- 

१) टोलची मुदत संपली अन रस्त्यावर पडलेले खड्डे
२) रस्त्यावर अतिक्रमणासह अनेक अडथळे,
३) महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीचा खच,
४) लोखंडी जाळ्या मोडलेल्या अवस्थेत तर कमी उंचीचे रस्ता दुभाजक,
५) पावसाळ्यात महामार्गावरच पाणी साचणे,

६) महामार्ग व सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग,
७) रस्त्यावरील धुळीमुळे नागरीक व वाहनधारक हतबल
८) ठिकठिकाणी तुटलेले लाईट कटिंग बॅरिअर,
९) धोकादायक स्थळी हायमास्ट दिवे,
१०) अपघातसमयी महत्वाचे असलेल्या दूरध्वनी क्रमांकांच्या पाट्या गायब,
११) महामार्गाला ड्रेनेजची व्यवस्था नाही

 

याबाबत बोलतांना “प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघा” चे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब काळभोर म्हणाले, हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) विभागाकडे असला तरी, त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

रस्त्यालगत वाढलेली हॉटेल, ढाब्यांची संख्या, त्यामध्ये राजरोसपणे होणारी अवैध दारूविक्री, काही हॉटेल व्यावसायिकांच्या भल्याचा विचार करून हॉटेलसमोर रस्त्यावर घातलेले गतिरोधक, लोकांनी सोईसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्तादुभाजक, व्यावसायिकांनी बेकायदा मुख्य रस्ता व सेवा रस्त्याला जोडण्यासाठी मुरूम टाकून तयार केलेला जोड रस्ता व सेवा रस्त्यावर वाढलेले नागरिकांचे अतिक्रमण यांसारख्या अनेक गोष्टी वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत.

याचबरोबर रस्त्यावर वाहने थांबविणे, दारू पिऊन वाहने चालविणे, लेनची शिस्त न पाळणे यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. यामुळे या गोष्टींना आळा घालून चालकांमध्ये प्रबोधन करण्या बरोबरच बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39
Next Post

Post News : ग्रामीण भागातील नागरिकांनाही पोस्टाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत - पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp