Political News : मुंबई- काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच कृषी क्षेत्रात योगदान किती मोठं आहे, असं म्हणून कौतुक केलं होतं. आता तेच मोदी शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल करत आहेत. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी आहे. मग तुम्ही काय केलं, तुमच्या काळातच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वात जास्त आत्महत्या आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या १० वर्षात सर्वात जास्त
पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले दुसरे उत्तम कृषीमंत्री हे शरद पवार आहेत. कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी गुजरातलाही मदत केली आहे, तशी मदत आताही होत नसेल. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, यावेळी बोलताना पीएम मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता टोला लगावला.
यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या १० वर्षात सर्वात जास्त आहेत. तुम्ही शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे आणले. यासाठी शेतकरी आंदोलनाला बसले होते. हे आपलं अपयश आहे, विरोधी पक्षाच्या राज्यात जायचं आणि त्यांच्या आरोप करायचं हे आपलं धोरण आहे. तीन कायदे आंदोलनामुळे पाठिमागे घ्यायला लागले. तुम्ही शेतकऱ्याचं उत्पादन वाढवलं का, असं काहीच केलं नाही, तुम्ही खोट बोलत आहात, असंही राऊत म्हणाले.