माळशिरस: भावकीतील भांडणातील गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदार याच्या पत्नीस अटक न करण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात यासएसीबीने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन भावांमध्ये भांडणे झाली होती. यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्याचे भाऊ यांना सदर गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयातून जामिन मिळाला होता. तक्रारदार यांच्या पत्नीस अटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ८ हजार एवढी रक्कम ठरली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार सायबन्ना कोळी, संतोष नरोटे, गजानन किणगी, चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून थोरात याला ८ हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.