गणेश सुळ
PMPL News : केडगाव : पुणे ते पारगाव यादरम्यान पीएमपीएलने बससेवा सुरू केली आहे. परंतु काही कारणास्तव पीएमपीएलने बसच्या फेऱ्या कमी केल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवासी यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीएल बसच्या फेरींमध्ये वाढ करावी. अशी मागणी प्रवासी संघटनांसह विद्यार्थी, कामगार व स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन प्रवाशांनी नुकतेच पीएमपीएलचे अधिकारि बकोरिया सर यांना दिले आहे.(PMPL News)
पीएमपीएल बसच्या फेरींमध्ये वाढ करावी.
पुणे महानगरपालिकेने पीएमआरडीच्या हद्दीमध्ये पीएमपीएलची बससेवा सुरू केली आहे. यामध्ये पूणे ते पारगाव अशी बससेवा सुरू झाली आहे. या बससेवेचा फायदा येथील विद्यार्थी, कामगार, महिलावर्ग कर्मचारी आदींना होत होता. बससेवा सुरू झाल्याने पुणे शहराशी दौंड तालुका जोडला गेला.(PMPL News)
त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी दौंड तालुक्यातील विद्यार्थी पुणे शहरात दररोज जाऊ लागले होते. तसेच, अनेक बेरोजगार युवक बस सुरू झाल्याने पुणे शहर,कात्रज , हिंजवडी, चिंचवड, वाघोली आदी परिसरात रोजगारासाठी दररोज जाऊ लागले होते. तालुक्यातील महिला वर्गदेखील मोठ्या संख्येने घराबाहेर पडला होता. बेरोजगारांना या बससेवेमुळे रोजगार मिळण्यास मदत झाली होती.(PMPL News)
विद्यार्थी वर्गासाठी ही बससेवा मोठी पर्वणी ठरली होती, कारण अभियांत्रिकी, मेडिकल, संगणकशास्त्र असे विविध शाखांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी दररोज या बससेवेमुळे ये- जा करत होते. तसेच तालुक्यातील शासकीय कर्मचारी यांनादेखील ही सेवा फायदेशीर ठरत होती.(PMPL News)
कामगार, विद्यार्थी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक सर्व प्रवासी बससेवेमुळे आनंदी होते; परंतु काही दिवसापासून या बससेवेची फेऱ्या कमी केल्या आहेत. दुपारी जवळपास 11 ते 4 वाजेपर्यंत एकही बस नसते,ही दुपारची बससेवा बंद झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.
दरम्यान, याबाबत दौंड चे आमदार राहुल कुल, दौंड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, भीमा पाटस चे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे यांनी पीएमपीएल प्रशासनाची भेट घेऊन बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत शेलार,योगेश भालेराव , रमण भालेराव ,संतोष आढागळे ,विकास निगडे, सचिन साळुंखे,आदी प्रवासी उपस्थीत होते.(PMPL News)