उरुळी कांचन, (पुणे) : ज्या ज्या ठिकाणी वनक्षेत्र असेल त्या त्या ठिकाणी झाडे लावून ती जगविण्यासाठीचा प्रयत्न आपण सार्वजन मिळून करू असे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.
भवरापूर (ता. हवेली) येथे संत निरंकारी मिशन यांच्या वतीने विशाल वृक्षारोपण व संगोपन अभियान “वननेस वन” या नावाने रविवारी (ता. १४) संपन्न झाला. यावेळी आमदार पवार बोलत होते. ग्रामपंचायत भवरापूर व वन विभाग पुणे यांच्या विशेष सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोनाल इंचार्ज ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, धंनजय साठे, भवरापूरचे सरपंच सचिन सातव, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, कोरेगाव मूळचे सरपंच विठ्ठल शितोळे, माजी सरपंच बबनराव साठे, सुभाष साठे, योगश साठे, संजय साठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, सुभाष टिळेकर, युवराज कांचन, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, मुख्य वनसंरक्षक प्रविण कुमार, उप वनसंरक्षक राहूल पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपरिमंडल सपकाळे, गायकवाड आदी गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
भवरापूर ग्रामपंचायत हद्दीत वनखात्याच्या सात एकर जागेमधे संत निंरकार मिशन, वन खाते, व भवरापूर ग्रामस्थांनी मिळून पंधरा हजार झाडांची लागवड केली. भवरापूर येथील ५२ एकर वनखात्याची जमीन संत निंरकारी मिशन यांनी तीन वर्षेसाठी दत्तक घेतली आहे. तीन वर्षामधे सव्वा लाख झाडांची लागवड या ठिकाणी होणार आहे. आज पहील्या फेजमधे पंधरा हजार झाडं लावण्यासाठी हजारो स्वयसेवक विविध भागातून उपस्थित राहिले होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन संत निंकार समितीचे झोनल इनचार्ज ताराचंद करमचंदानी सर, व क्षेत्रीय संचालक तावरे सर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भवरापूर माजी सरपंच सुभाष साठे यांनी केले तर आभार क्षेत्रीय संचालक तावरे सर यांनी मानले.