Pimpri News : पिंपरी : पुणे महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने सात जणांची तब्बल १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात घडली. Pimpri News
या प्रकरणी ४४ वर्षीय व्यक्तीने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात येथे फिर्याद दिली असून, एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pimpri News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःला पुणे महानगरपालिकेत आयुक्तांचा प्रशासकीय सचिव असल्याचे भासवले. महापालिकेत अनुकंपा तत्वावर लिपिक व शिपाई पदाच्या सहा जागा निघाल्या असून, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नोकरी मिळवून देतो, असे सांगून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. Pimpri News
यानंतर आरोपीने सात जणांकडून टप्प्याटप्प्याने तब्बल १६ लाख १८ हजार ५०० रुपये उकळले. मात्र पैसे घेतल्यानंतर कोणालाही नोकरी न देता टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. Pimpri News
दरम्यान, या घटनेमुळे सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलिस करत आहेत. Pimpri News






