पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली.भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली. या प्रकरणानंतर आता पिंपरी चिंडवड महापालिकेनं मोठा निर्णय घेत तब्बल 650 रुग्णालयांना नोटीस पाठवल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रस्तुसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे डिपॉझिट म्हणून तब्बल दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती.कुटुंबाने अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दर्शवली होती मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात न आल्याने वेळेत उपचार मिळू शकला नाही आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबियाकडून करण्यात आला आहे.. यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे रुग्णालयांना दिला आहे.
दरम्यान गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर विविध राजकीय पक्ष तसेच संस्था व संघटनाकडून रुग्णालयाबद्दल विरोध केला जात आहे.रुग्णालयाच्या दारात आंदोलनही केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालय परिसरात जमाबंदीचे आदेश ही दिले आहेत.