अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (नरकेवाडी) येथील रहिवाशी ज्येष्ठ विचारवंतलेखक प्रा. हरी नरके ( वय-६० ) यांनी मुंबई येथील आशिया हार्ट हॉस्पिटलमध्ये ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या ते पुणे येथे वास्तवाला असून त्यांच्या मागे पत्नी व अभिनेत्री प्रमिती नरके तु माझा सांगाती फेम हि त्यांची मुलगी आहेत.
हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पूरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरेखित करणे .शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडवून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाड्मयाचे २६ खंड प्रकाशित केले .त्यातील ६ खंडाचे संपादन प्रा.हरी नरके यांनी केले होते.
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्राध्यापक होते .प्रा हरी नरके यांची दोन पुस्तके प्रकाशित आहे. महात्मा फुले यांची बदनामी व एक सत्यशोधन आणि महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.