सुरेश घाडगे
परंडा Paranda News : परंडा भुईकोट किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राज्याचे आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ . तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. (Paranda News) या अनुषंगाने शुक्रवार ( दि . ५ ) तालुक्यातून दाखल झालेल्या चारशे सदस्यांनी भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. (Paranda News) सलग चार दिवस हि स्वच्छता मोहिम सुरु राहणार आहे. (Paranda News) अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांनी दिली. (Paranda News)
पालकमंत्री डॉ . सावंत यांचा पुढाकार
मराठवाड्याच्या सिमेवर उभा असलेला इतिहासाची साक्ष देणारा परंडा येथील भुईकोट किल्ला डौलदारपणे उभा आहे. या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करण्यासाठी पालकमंत्री डॉ . सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक , शिवप्रेमी , गडप्रेमी यांच्यासह धनंजय सावंत यांच्या हस्ते किल्ल्यांच्या साफसफाईचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि . प . माजी सभापती दत्ता साळुंके, माजी सभापती गौतम लटके ,नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जि.प . माजी सभापती नवनाथ जगताप , माजी सभापती दत्तात्रय मोहिते, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, तालुका संघटक जयदेव गोफणे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक संजय घाडगे, रत्नकांत शिंदे, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, दत्ता रणभोर, सतिष मेहेर, महेश कसबे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या किल्ल्याचा संपूर्ण परिसर, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला. खंदकाची सफाईसाठी पोकलेन यंत्राद्वारे करण्यात येत आहे. किल्ल्यांची साफसफाई पुढे चार दिवस करण्यात येणार आहे. किल्लास्थळी भैरवनाथ साखर कारखाना प्रशासनाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन