सुरेश घाडगे
परंडा : परंडा न्यायालय (जि. उस्मानाबाद ) येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास पदनिर्मितीसह महाराष्ट्र शासनाने बुधवार ( दि. १२ ) मंजूरी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (विधी व न्याय मंत्री) यांच्याकडे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. मंजूरी मिळाल्याबद्दल परंडा विधीज्ञ संघाच्या वतीने माजी आमदार ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला आहे .
यावेळी जेष्ठ विधिज्ञ ॲड. दादासाहेब खरसडे, ॲड. सुभाषराव मोरे, ॲड. बजरंग सुर्यवंशी, ॲड. सुजित देवकते,ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. श्रीकांत भालेराव, ॲड. गणेश खरसडे, ॲड. संदीप पाटील, ॲड. सुभाष वेताळ, ॲड. सुनिल काळे, ॲड. भालचंद्र औसरे, ॲड. जहिर चौधरी, ॲड. भुजंगराव जामदारे, ॲड. नागनाथ सुर्यवंशी, ॲड. बापु जामदारे, ॲड. हनुमंत घोगरे, ॲड. रणजित खरसडे, ॲड. अमोल पाटील, ॲड. राजाभाऊ काळे, ॲड. .टी.यु.वाघमारे, ॲड. आप्पासाहेब जगताप,ॲड. संदीप शेळके, ॲड. राशनकर आदि उपस्थित होते .