Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking – पांचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 October 2022, 17:20

लहू चव्हाण

पांचगणी : बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना पांचगणी गिरिस्थांन नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर बुधवार (ता. १२) सकाळी रोजी यांच्यावर बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनमोल अशोक कांबळे (रा. पाचगणी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नावे आहे.

 

पांचगणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे बुधवारी ( ता. १२) सकाळी रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर आठवडा बाजारात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेते सर्वेक्षणाचे काम व बाजारातील स्वच्छता पाहणी करण्याचे कामासाठी मुख्याधिकारी यांचे बरोबर बांधकाम मुकादम सूर्यकांत कासुर्डे ,स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे , लिपिक रवींद्र कांबळे व सागर बगाडे शिवाजी चौकात आले.

दरम्यान, त्या ठिकाणाहून सर्वजण पथविक्रेते सर्वेक्षण तसेच बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत निघाल, ते महात्मा फुले हायस्कूलचे जुनी इमारतीचे गेट जवळ पोहचले. आणि त्यानंतर अनमोल कांबळे (रा. पाचगणी) हा सर्वांचे समोर येऊन मुख्याधिकारी यांना अडवून मला नोटीस का काढणार आहात असे बोलून मुख्याधिकारी यांचा हात पकडुन धक्का देऊन खाली पाडून त्यांना जखमी केले. आणि मग त्याने त्याच्या हातातील बाटलीमधील काळे द्रव्य मुख्याधिकारी यांच्या अंगावर टाकून हल्ला केला.

ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच सर्व पालिका कर्मचारी कार्यालयात जमा झाले. यावेळी काही काळ वातावरण तप्त झाले होते. त्यांनतर मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात गेले. कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे काम बंद ठेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देवून वारंवार कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या नराधमामुळे कामकाज करणे असुरक्षित झाले आहे. तरी याचा तातडीने बंदोबस्त करावा व त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात अनमोल कांबळे याचेविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणून हल्ला केलेबाबत गुन्हा दाखल केला असून पांचगणी पोलिसांचे पथक कांबळे याच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

या घटनेची माहिती समजताच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील , वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांचेबरोबरच पांचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलीस ठाण्यात दाखल झाले व या घटनेचा जाहीर निषेध करीत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी- माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.