Panvel : पनवेल : ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे काम देतो, असे सांगून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चौघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
करंजाडे येथील प्रतिभा शुक्ला यांना सप्टेंबर २०२३ मध्ये अनोळखी महिलेकडून टेलिग्रामवर जॉबचा मेसेज आला. यावेळी वर्क फ्रॉम होम, दररोज पगार, बोनस मिळेल, असे सांगण्यात आले व त्याच्याखाली तीन प्रश्नांची पटापट उत्तर देण्याबाबत इंग्रजीत मेसेज आला. त्यात त्यांनी उत्तरे टाईप करून पाठवली. त्यानंतर त्यांना किवी ८३५ या टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. (Panvel) त्यानंतर आदित्य मुखर्जी या नावाने मेसेज आला.
मंजू बिमला यांच्याकडून जॉबसंदर्भात नंबर मिळाला असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. रजिस्ट्रेशन करताना करंजाडे, सेक्टर ४ येथील बचत खात्यातून पैसे वजा झाले. यावेळी १० लाख ८८ हजार रुपये डिपॉझिट करा, मग तुमचे पैसे विड्रॉल करतो, असे सांगण्यात आले. (Panvel) त्यापैकी फिर्यादी यांनी दोन लाख रुपये संबंधितांच्या खात्यात डिपॉझिट केले. मात्र, त्यांनी डिपॉझिट केलेले पैसे परत केले नाहीत.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तात्काळ पोलिस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला टोळक्याची मारहाण ; तिघांना बेड्या..
Pune News : शेतात राबणाऱ्या हातांना पोलिस भरतीत यश ; ललिता झाली मुंबई शहर पोलीस चालक..