Pancagaṇi News : पर्यटन नगरी पांचगणी शहरातील शॉपिंग सेंटर येथील व्यावसायिकांनी पालिकेच्या मंजूर गाळ्याव्यतिरिक्त केलेले बांधकाम, पत्रा-शेड सात दिवसांच्या आत काढून घ्यावीत, अशी नोटीस पालिकेने 39 गाळाधारकांना बजावली आहे. पालिकेच्या या नोटीसांमुळे गाळाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.(Pancagaṇi News)
पालिकेच्या या नोटीसांमुळे गाळाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालिकेचे नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर येथे आपणाला गाळा मंजूर असून, त्याचे क्षेत्रफळ मोजून नगरपरिषदेने गाळाधारकांना त्यांच्या ताब्यात देताना ज्या स्थितीत होता तसाच ठेवणे संबंधितांवर बंधनकारक आहे.(Pancagaṇi News) देऊ केलेल्या गाळ्याच्या चतुःसीमामध्ये बदल करणे किंवा पोट भाडेकरू ठेऊन उत्पन्न कमावणे, भाडेकरूकडून अभिप्रेत नाही. सदर गाळ्यामध्ये नगरपरिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचे अंतर्गत बदल किंवा गाळ्याशी संलग्न पुढच्या अथवा मागच्या बाजूस तसेच गाळ्याच्या दर्शनी भागात पत्रा शेड उभारणे बेकायदेशीर आहे. तसे असल्यास संबंधितांनी स्वतःहून 7 दिवसांच्या आत काढून घ्यावे. अन्यथा विहित मुदत संपल्यावर नगरपरिषद काढून घेईल.(Pancagaṇi News)
तसेच नगरपरिषदेची पूर्व परवानगी न घेता जे काही अंतर्गत बदल केले असतील ते ही पूर्ववत करावेत. अन्यथा नगरपरिषद ते पूर्ववत करेल व संबंधित खर्चाची वसुली गाळेधारकाकडून करेल. मुख्याधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता बांधकाम रचनेत बदल किंवा पोट भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व इतर संबंधित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे दिलेल्या नोटीसीमध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी, पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद यांनी नमूद केले आहे.(Pancagaṇi News)