Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Madha News : माढा ते खैराव एसटी चव्हाणवाडी मार्गे सोडण्याची मागणी ; आगार व्यवस्थापकांचे बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 June 2023, 19:34

राजेंद्रकुमार गुंड 
Madha News माढा : मागील वर्षापासून माढा-मानेगाव-खैराव ही एसटी बससेवा सकाळी व सायंकाळी एक फेरी अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू आहे. (Madha News) परंतु या मुख्य मार्गापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चव्हाणवाडी गावाला वगळून ही बससेवा सुरू केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व कुचंबना होत आहे.  (Madha News)

तेव्हा ही बससेवा चव्हाणवाडी मार्गे सुरु करावी, यासाठी आमदार बबनदादा शिंदे व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय आनंदनगर-मानेगाव, केवड-चव्हाणवाडी ग्रामपंचायत व प्रवाशी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन आगार‌ व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी दिले आहे.

केवड-चव्हाणवाडी या संयुक्त ग्रामपंचायत असलेल्या चव्हाणवाडी गावाची लोकसंख्या 400 च्या दरम्यान असून, गावात फक्त इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना मानेगाव व माढ्याकडे जावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. या गावातील दररोज 30 ते 35 विद्यार्थी व नागरिक कामाच्या निमित्ताने माढा व मानेगावकडे जातात. परंतु त्यांना बस पकडण्यासाठी पाच किलोमीटर कडक ऊन, वारा, पाऊस व थंडीत पायपीट करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरीही चव्हाणवाडी गाव हे एसटी बसने जोडलेले नाही. मागील वर्षांपर्यंत खराब रस्त्याचे कारण होते. परंतु आता आ. बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून एक कोटींच्या निधीतून गावापर्यंत संपूर्ण रस्त्याचे पक्के डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने कुर्डूवाडी आगारप्रमुख व आ.बबनराव शिंदे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही बससेवा तातडीने सुरू होणार आहे.

दरम्यान, कुर्डूवाडी येथील आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे चव्हाणवाडी मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी करताना सहाय्यक वाहतूक अधिक्षक विजय हांडे, लेखाकार विजय बुटे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक शिवराज पाटील, मुख्याध्यापक प्रवीण लटके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Political News : अशा गोष्टी कधी-कधी होत असतात; उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर काय म्हणाले, फडणवीस?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.