Pan & Aadhar linking : पॅन आणि आधार कार्ड या दोन्ही डॉक्यूमेंट्सला लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. ३० जून २०२३ पर्यंत यूजर्सला १ हजार रुपये दंड देऊन पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र पॅन आणि आधार कार्ड जर लिंक केले नसतील तर सरकार पुन्हा मुदत वाढवणार का याविषयी तज्ञ लोकांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मुदत 4 महिन्यांनी वाढवावी असे तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञांनी म्हटलं की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. अशा वेळी ज्या टॅक्स पेयर्सचे पॅन लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून रोजीच संपते. (Pan & Aadhar linking ) अशा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, काहींचे म्हणणे आहे की पॅन लिंकिंगची अंतिम मुदत संपल्यामुळे अनेक कामे पेंडिंग राहू शकतात. अशा वेळी ती लिंक करण्याची अंतिम मुदत सुमारे 4 महिन्यांनी वाढवली जावी. सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवावी. कारण तसे न केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरण: केसमधील मोठी माहिती आली समोर
Pune News : पावसाची जोरदार हजेरी, मावळातील तब्बल ८ गावांचा तुटला संपर्क