राहुलकुमार अवचट
palakhi News : यवत : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी करून जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूकडे परतीच्या प्रवास करीत आहे. हा पालखी सोहळा यवतवरून देहूकडे मार्गस्थ झाला आहे.(palakhi News)
परतीच्या पालखी सोहळ्यास वाढता प्रतिसाद!
पंढरपूर येथे गोपालकाला, पादुकांना स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट आणि नगरप्रदक्षिणा करून पालखी सोहळा दि.३ रोजी परतीच्या प्रवासाला निघाला आहे. या पालखी सोहळ्याचा रविवार (दि.९ जुलै) रात्रीचा मुक्काम दौंड तालुक्यातील वरवंड येथे झाला. त्यानंतर पालखी सोहळ्याचे आज सोमवार (ता.१०) सकाळी देहुकडे प्रस्थान झाले. परतीच्या मार्गावर असलेल्या पालखी सोहळ्याचे वाटेत चौफुला, वाखरी, भांडगाव, यवत येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.(palakhi News)
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पालखी सोहळा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आला. आणि दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी सोहळा विसावला. पालखी दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे व फराळाचे वाटप करण्यात आले. काही काळ विश्रांती घेत पालखी सोहळ्याने दुपारी दोनच्या सुमारास देहुकडे प्रस्थान केले.(palakhi News)
दरम्यान, पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम उरुळी कांचन येथे आहे. त्यानंतर पुढे ११ नवी पेठ-पुणे, दि. १२ पिंपरी गाव याप्रमाणे मुक्काम करून गुरुवार दि. १३ जुलै रोजी पालखी सोहळा देहू मध्ये दाखल होणार आहे.(palakhi News)
पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असत व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्यांची संख्या वाढली असून प्रवासादरम्यान नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती पालखी डोळ्यातील वारकऱ्यांनी दिली आहे.