लहू चव्हाण
Pachgani News : (सातारा) : निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून ग्रामस्थांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.(Pachgani News)
ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.
पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथील श्रीराम मंडळ सेवा ग्रुपच्या माध्यमातून १० हजार झाडांचे वृक्षारोपनाचे उदिष्ठ ठेवले असून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितीन भिलारे बोलत होते.(Pachgani News)
यावेळी भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, जावली कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक राजेंद्र आबा भिलारे, सुरेन्द्र भिलारे, श्रीराम मंडळाचे अध्यक्ष सुभाषशेठ भिलारे व श्रीराम सेवा ग्रुपचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.(Pachgani News)
यापुढे बोलताना नितीन भिलारेम्हणाले, “वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे. सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीराम विकास सोसायटीचे उपाध्यक्ष व श्रीराम सेवा ग्रुपचे सदस्य विश्वनाथ भिलारे यांनी केले आहे.