Pachgani News : पाचगणी, (सातारा) नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांना शून्य कचरा निर्मिती या प्रकल्पाची माहिती आणि सादरीकरणासाठी मध्यप्रदेशातील इंदोर या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आहे. (Pachgani News)
इंदोर येथील आय.आय.एम. सेंटर येथे शुन्य कचऱ्यावर माहिती..
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सदैव अग्रेसर राहिली आहे. पालिकेने या अभियानात सलग दुसऱ्या वर्षी देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील इंदोर या महानगरीत विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
या निमंत्रणामुळे पाचगणी शहराची घनकचरा व्यवस्थापन, शून्य कचरा निर्मिती या क्षेत्रातील मक्तेदारी पुन्हा एकदा राज्याबाहेर सिद्ध झाली आहे. आणि त्यामुळेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना या प्रकल्पाबाबतची इत्यंभूत माहिती सादर करण्यासाठी आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे. (Pachgani News)
दरम्यान, मुख्याधिकारी मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता इंदोर येथील आय.आय.एम. सेंटर येथे शुन्य कचऱ्यावर माहिती देणार आहेत. (Pachgani News)