Pachgani News : पाचगणी: रयतेचे स्वंतत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जेष्ठ शु.त्रयोदशी (ता. ६ जून १६७४) रोजी झाला. ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. या घटनेची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने पाचगणीकरांच्या वतीने तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. (Shiv Rajyabhishek Day is celebrated with enthusiasm according to the date)
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, नानासाहेब कासुर्डे, साहेबराव बिरामणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, प्रविण बोधे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Pachgani News) जिल्हा सहसंघचालक डाॅ.अभय देशपांडे, तालुका समन्वयक मंगेशभाई उपाध्याय, डाॅ.सुधिर बोधे, तानाजी भिलारे, तालुका कार्यवाह विजय पवार, सहकार्यवाह शेखर भिलारे,अशिश दवे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहूल पुरोहित, नंदकुमार बोधे आदी मान्यवर उपस्थित होते.
जय भवानी.. जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याची दररोज नित्यनेमाने पुजा करणाऱ्या गणेश प्रकाश शिंदे व आदेश गजानन कासुर्डे यांच्या (Pachgani News) हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जय भवानी.. जय शिवाजी या जय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी डॉ.अभय देशपांडे यांनी मुघल साम्राज्याचे क्रौर्य व छत्रपती शिवाजी महाराज यांची न्यायव्यवस्थेचा इतिहास सांगितला. पाचगणी व परिसरातील (Pachgani News) शस्त्र प्रशिक्षण घेतलेल्या पंधरा मुलींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फटक्यांची आतिषबाजी,
आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचलन प्रमोद पवार तर आभार डाॅ.भारती बोधे यांनी मानले. कार्यक्रमाला पाचगणी व परिसरातील अबालवृद्ध उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : भारती विद्यापीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
Pachgani News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन !