Pachgani News : : पाचगणी : जगाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज आहे. त्यांच्या विचारांवरच जग चालले आहे. त्याच विचाराने प्रभावित होऊन पँथर सेना बुध्दजयंतीचे औचित्य साधत महामानवांची संयुक्त जयंती साजरी करत आहे, हे कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी काढले. (Gautama Buddha’s inspiring thoughts are needed by the whole world today; Balkrishna Desai)
पँथर सेनेतर्फ़े महामानवांची संयुक्त जयंती साजरी
पाचगणी येथील कै.भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर गौतम बुध्दांच्या जयंतीचे औचित्य साधून पँथर सेनेने सालाबादप्रमाणे यंदाही महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली. यावेळी बाळकृष्ण देसाई बोलत होते. (Pachgani News : )
यावेळी पॅंथरसेना राज्य अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे, संजय गाडे, सचिव किरण बगाडे, परवीन मेमन, अरुण कांबळे, मंगेश मालुसरे, मुख्याध्यापक साहेबराव गोळे, राजू काकडे, सुनंदा मोरे, महिला अध्यक्षा छाया परिहार, नूतन बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक व दोन मधील विद्याथ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (Pachgani News : ) तद्नंतर अथर्व प्रस्तुत सुमधुर भिमगितांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास पाचगणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. आभार राजू काकडे यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News | खिंगर ग्रामपंचायतीचे श्रीनिवास पाटलांनी केले कौतुक…