Pachgani News : पाचगणी : मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटननगरी पाचगणी शहर व परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
पाचगणी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक
पाचगणी पोलिस ठाण्याच्या वतीने शांतता समिती सदस्य व विविध गावच्या पोलिस पाटील यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत राजेश माने बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, (Pachgani News) पाचगणी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे, समाजसेवक प्रकाश गोळे, नितीन दुधाणे, रुपेश बगाडे, अंकुश मालुसरे, किरण पवार, संजय चव्हाण, पोलिस पाटील, सुप्रिया आंब्राळे, अजय राजपुरे, विशाल पवार, रुपाली कांबळे, रुपाली गोळे, योगिता खरात, मनिषा पांगारे, राजेंद्र दुधाणे, शैलेश भिलारे, जितेंद्र दाणवले आदी मान्यवर उपस्थित होते.
माने पुढे म्हणाले, सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रकाशित होत असल्याने जातीय तणाव निर्माण होत आहे. नागरिकांनी कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य किंवा मेसेज पाठवू नयेत, काही चुकीचे संदेश दिले जात असल्याचे आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. (Pachgani News) कोणत्याही जातीसमूहाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजेश माने यांनी दिला.