लहू चव्हाण : पाचगणी
Pachagani News : पाचगणी, (सातारा) : पर्यावरण रक्षणाबाबत भाषणे अनेकजण देतात, माहितीपत्रकेही प्रसिद्ध करतात. प्रत्यक्ष कृती कितीजण करतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा पाचगणीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघचालक डॉ. अभय देशपांडे यांची कृती सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालते. (Pachagani News)
डॉ. देशपांडे दररोज सकाळी टेबल लॅंन्ड पठारावर चालण्याचा व्यायाम करतानाही रस्त्यात दिसणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, कागद, बाटल्या गोळा करतात आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य त्याठिकाणी देतात. (Pachagani News)
पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लास्टिकचा वापर धडाक्यात व खुलेआमपणे सुरू असून त्याचे ना प्रशासनाला सोयरेसुतक ना नागरिकांना. अधूनमधून प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम घेतली जाते नि तेवढय़ाच आकस्मिकपणे ती थांबवली देखील जाते. (Pachagani News)
दरम्यान, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान किती हानिकारक आहे हे जाणनाऱ्या या अवलियाचे हे सेवाकार्य अखंडपणे सुरू आहे. त्यामुळेच ते “पुणे प्राईम न्यूजच्या” बातमीचा विषय ठरते. रोजच्या स्पर्धेच्या धावपळीच्या जगात पर्यावरणाचे व मानवतेचे रक्षण करणाऱ्या देशपांडे यांच्या या कार्याची म्हणूनच दखल घ्यावीशी वाटली. (Pachagani News)