लहू चव्हाण :
Pachagani News : पाचगणी, (सातारा) : राजपुरीतील कै. एम. आर. भिलारे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी जतीन भिलारे यांना ‘वर्ल्ड वाईड अचिव्हर्स’ दिल्ली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘मोस्ट ऍडमायर प्रिन्सिपल अवार्ड’ जाहीर झाला आहे. तेजस्विनी भिलारे या भिलार येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका देखील आहेत. (Pachagani News)
तेजस्विनी भिलारे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट, कुलाबा येथे होणार आहे. (Pachagani News)
दिल्ली येथील ‘वर्ल्ड वाईड अचिव्हर्स’ आणि झी न्यूज प्रायोजक असलेल्या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. त्यांच्या कार्याची इतरांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. (Pachagani News)
तेजस्विनी भिलारे या स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या स्नुषा असून, यापूर्वी त्यांना सकाळ ग्रुपचा मानाचा महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार, जर्नालिस्ट फाऊंडेशनचा भास्कर अवॉर्ड, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार २०२२, ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३ आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भिलारे यांना ‘मोस्ट ऍडमायर प्रिन्सिपल अवार्ड’ जाहीर झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Pachagani News)