लहू चव्हाण
Pacagani News : गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील प्रवेशद्वाराजवळ असलेली कचराकुंडी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असल्याने दैनंदिन ये-जा करणारे प्रवासी, पादचारी, वाहनचालक व स्थानिक नागरिक यांना नाहक त्रास होत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र याकडे गोडवली ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे तिचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.(Pacagani News)
ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे तिचा कारभार चव्हाट्यावर.
ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळील कचराकुंडीत प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, हॉटेल मधील सडलेल्या भाज्या, घरातील ओला व सुका कचरा आशा प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला टाकला जातो. यामुळे परिसरातील वातावरणाला दुर्गंधीचे तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. (Pacagani News)
गोडवली ग्रामपंचायतीने कचरा पडण्याच्या ठिकाणी कचराकुंड्या बांधल्या. परंतु ग्रामपंचायतीकडे कचरा उचलण्याची यंत्रणाच नसल्याने कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत. कचराकुंडी भोवतालीचा संपुर्ण भाग कचरामय झाला आहे. सध्या अधूनमधून पावसाच्या सरी पडून जात आहेत. त्यामुळे कचरा कुजून सडला आहे. या मध्ये पावसाचे पाणी साठून डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या डासांची फैलाव झाला तर नागरिकांच्या धोका निर्माण होऊ शकतो.(Pacagani News)
दरम्यान, कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट फिरणारी कुत्री, डुकरे व इतर जनावरांमुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या कचराकुंडी नागरिकांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने यात लक्ष घालून वरील समस्या सोडविण्यासाठी त्वरित मार्ग काढावा. अशी मागणी प्रवासी,पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.(Pacagani News)