Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली. या घटनेनंतर केलेल्या तपासात पुण्यातील एका तरूणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भुजबळ यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याबाबत भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना भुजबळांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडानंतर घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune News) या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एका तरुणाला महाड (जि. रायगड) येथून अटक केली आहे.
पवार कुटुंब अशा गोष्टी करत नाही
या घटनेनंतर प्रथमच छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. काही जणांनी याप्रकरणी पवार कुटुंबावर संशय घेतला आहे. मात्र, मी ठामपणे सांगेन, पवार कुटुंब अशा गोष्टी करत नाहीत. शरद पवार तर मुळीच अशा गोष्टी करत नाहीत. (Pune News) पवार धमकी देण्याची कामे करत नाहीत. तर ते वैचारिक लढाई लढतात, असं छगन भुजबळ म्हणाले. अतिउत्साही लोक अशा धमक्या देण्याचं काम करतात, असंही ते म्हणाले.
आम्ही भुजबळांना मारणार आहोत, अशी धमकी दिली गेली होती. याप्रकरणी पोलिसांना सगळं कळवलं आहे. पोलीस या प्रकाराचा तपास करत आहेत. पोलीस काय कारणं आहेत ते शोधतील, असं छगन भुजबळ म्हणाले.
या वेळी बोलताना भुजबळ यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील भाष्य केले आहे. (Pune News) मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील. मविआत असतानाही एक महिन्यानंतर खातेवाटप झालं होतं. आताही लवकरच खातेवाटप होईल, असं भुजबळ म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; पुणे जिल्ह्याला किती मंत्री मिळणार?