लोणी काळभोर, (पुणे) : ग्रामपंचायत कदमवाकवस्ती व आनंदी परिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महिला बचत गटांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन कदमवाकवस्ती येथील एका ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषदेच्या शालिनी कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शालिनी कडू यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिलांसाठी असणाऱ्या विविध योजना इत्यादीची माहिती दिली. तसेच कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तर आनंदी परिवार फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुमार गायकवाड यांनी महिलांसाठी कार्यशाळा घेतली. यावेळी महिलांशी विविध विषयांवर संवाद साधला. व्यवसाय विषयक अनेक गोष्टी, बारकावे इत्यादी महिलांना सांगितले, पैसा कसा वापरला पाहिजे, कसा कमावला पाहिजे असे अतिशय अनमोल मार्गदर्शन त्यांनी महिलांना केले व अतिशय चांगल्या वातावरण हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैजयंता कदम, राजश्री काळभोर, सविता साळुंखे, माधुरी काळभोर, माजी ग्रामपंचायत सदस्या वसुधा केमकर, पोलीस पाटील प्रियांका भिसे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण घोळवे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच बचत गटांमधिल महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार चित्तरंजन गायकवाड यांनी मानले व सूत्रसंचालन सिद्धेश कायगुडे यांनी केले.