उरुळी कांचन, (पुणे) : श्रीकृष्ण मंदिर व श्रीकृष्ण सेवा मंडळ आयोजित उरुळी कांचन ते लोणी पारनेर मोटारसायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्या प्रमाणे अटन विजन भिक्षा भोजन या उक्तीप्रमाणे व धर्माचा प्रसार प्रचार व स्थान वंदन दर्शन लिळा चिंतन स्मरण व प्रबोधन घडावे यासाठी ही मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती. धावपळीच्या जीवनात वेळेच्या अभावी पायी यात्रा शक्य नसल्याने परंतु एक दिवस का होईना ईश्वराने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण दिवस परमेश्वराच्या सानिध्यात असण्याचा आनंद सदभक्तांना झाला आहे.
यावेळी तिर्थस्थान यात्रेचे आयोजन प. पु. सुबोधमुनी धाराशिवकर यांनी केले. याप्रसंगी विजय मुरकुटे, बापु कांचन, राजु कांचन, राजेंद्र घुले, गोकुळ मुरकुटे, संजय कांचन, बाळु ढावारे, रामभाऊ कांचन, महेश गवळी, विकास महाडिक आदी उपस्थित होते.