राहुलकुमार अवचट
यवत : मिरवडी (ता. दौंड) येथील जर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या विशेष चर्चासत्रामध्ये यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मिरवडी ग्रामपंचायतच्या वतीने ब्रिद वाक्य असलेले “प्रत्येक पाउल प्रगतीकडे” प्रमाणेच गावातील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीखऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी, यासाठी ” मी कसा घडलो” या अंतर्गत मोठी मोठी स्वप्ने पाहण्याची संधी मिळावी आणि त्या संधीचा पाठलाग करताना विविध विषयातील नामवंत, कर्तबगार व कर्तुत्ववान व्यक्तींची हितगुज करण्याची चर्चा संधी विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने दर शनिवारी आयोजित केले जाणाऱ्या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये शनिवारी (ता. ०३) यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याशी जवळपास दीड ते दोन तास चर्चासत्र घडवून आणले होते. यावेळी नारायण पवार यांनी आपल्या बाल जिवनापासुन पोलिस निरीक्षक पदापर्यंत आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करत पुढील वाटचालीस आवश्यक असे मार्गदर्शन केले. तालुकास्तरावर क्रमांक पटकवलेल्या नौशाद रजिस शेख व अमर उमेश शेलार या विद्यार्थ्यांचा सन्मान नारायण पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थी ,शिक्षक ,ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामपंचायत मिरवडी व शाळेच्या वतीने मुलांचे उज्वल भवितव्य, स्वप्न मजबुत करण्यासाठी, विविध क्षेत्रातील अनुभव देण्यासाठी याबरोबरच भविष्यात आपले ध्येय साधण्यासाठी विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, खेळाडू, समाजसेवक याबरोबरच अनेक क्षेत्रातील नामवंत मंडळीच्या आयुष्याचा उलगडा या चर्चासत्रातुन केले जाते यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड व हुरुप मिळत आहे.