विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीमधील बहुतांश खाजगी रुग्णालये व क्लिनीक आपल्या पसंतीच्या मेडीकलमधुनच औषधे खरेदीची सक्ती करत असल्याचा मुद्दा ”पुणे प्राईम न्यूज” ने गेल्या रविवारी उजेडात आणला असतानाच, दुसरीकडे रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी निर्माण झालेल्या पॅथॉलिजी लॅबोरेटरीजही पूर्व हवेली लावलेले मधील अनेक छोट्या-मोठ्या खासगी रुग्णालयांसाठी एक मोठा व स्वत जोडधंदाच बनल्याचे चित्र पूर्व हवेलीत निर्माण झाले आहे.
रुग्णाला गुंतागुंतीच्या आजार असो वा सर्दी-ताप, गरज असो वा नसो पूर्व हवेलीमधील बहतांश रुग्णालयात रुग्ण आला की रुग्णांची रक्त, लघवीसह अनेक खर्चीक तपासण्या आपल्याच पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज मधुन करुन घेत आहेत. विशेष बाब म्हणजे रुग्णालयाने रकमंड केलेल्या पॅथॉलिजी लॅबोरेटरीजमधील रिपोर्टच्या खरेखोटेपणाबाबत उलट-सुलट चर्चा कोरोना पासुन सुरु झाली. या पॅथलॅब तपासण्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे.
पूर्व हवेलीत रक्त, लघवी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम. आर. आय., यासारख्या तपासण्या करणाऱ्या लॅबची संख्या सध्या वाढत आहे. या सर्वच लॅबचे दर वेगवेगळे असून, कोठेही याचे दरपत्रक प्रशास नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फक्त एम.डी. पॅथॉलॉजिस्टनाच अशा लॅब चालविण्याचा अधिकार असताना, ठिकठिकाणी या लॅबचे पेव फुटले आहेत. विशेष बाब म्हणजे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजमधील रिपोर्टच्या खरेखोटेपणाबाबत उलट सुलट चर्चा होत असल्याने, एकुणच वरील प्रकरण शासनाने गंभीररित्या घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उरुळी कांचन, लोणीकाळभोरसह पूर्व हवेलीत साधारणपणे एम.डी. पॅथॉलॉजिस्टची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असताना, लॅबची संख्या मात्र शेकडोंमध्ये आहे.यावर शासन म्हणून कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रत्येक लॅबने मनमानी दर आकारून रुग्णांची पिळवणूक चालविली आहे. काही खासगीरुग्णालयांचे तर विशिष्ट पॅथलॅबशी साटेलोटे आहेत.
या रुग्णालयांमधून रुग्णांना ठराविक लॅबमधूनच रक्त व इतर घटक तपासणीचा आग्रह धरला जातो. तसेच एखाद्या लॅबने नुकतीच केलेली तपासणी अवैध ठरवत पुन्हा नव्याने आपल्याच लॅबमधून तपासणी करण्याचा आग्रह धरला जातो. यामध्ये
खासगी रुग्णालयांचे ‘कट प्रॅक्टिस’ असल्याचा दाट संशय आहे. पूर्व हवेलीमधील किती प्रयोगशाळांमधील चाचण्या या प्रत्यक्ष पॅथॉलॉजिस्टच्या निगराणीखाली होतात, हा तर संशोधनाचा विषय ठरावा, अशी एकंदर स्थिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान उरुळी कांचन मधील एक लॅब चालक डॉक्टरांना दर शनिवारी पाकीटे वाटप करत असल्याची चर्चा आहे. काही लॅबचे सरकारी रुग्णालयांशीही साटेलोटे असून, या ठिकाणीही त्यांनी आपले एजंट नेमले आहेत. एकंदरीत या सर्व प्रकाराकडे आरोग्य खाते पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याची चर्चा आहे. पॅथॉलॉजी रिपोर्टवर अधिकृत एमबीबीएस, एम डि पंथालिजीची अशी शैक्षणिक पात्रता धारण करणारा आहे. अशांनाच सही करण्याचा अधिकार असतो. एखादा एम डी पॅथॉलॉजीस्ट एखाद्या लॅबवर प्रत्यक्ष उपस्थित राहून लॅबच्या रिपोर्टवर सही-शिक्याचा वापर करू शकतो. मात्र पूर्व हवेलीत सही केलीली लेटरहेड वापरून, अनेक पंथालिजी लॅबोरेटरीज मधुन रक्त, लघवीसह सर्व प्रकारचे रिपोर्ट दिले आहेत.
पूर्व हवेलीत अनेक डॉक्टरांनी आपल्याच क्लिनिकमध्ये अथवा रुग्णालयात अनधिकृतपणे लॅब ऊभारून रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा चार्ज आकारून आर्थीक लूट चालवलेली असल्याचे दिसते. अनेकांच्या लॅबला परवानगीही नसते तरीही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून ही दुकानदारी सुरु असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार अधिकृत पॅथीवाले १०० रुपये किंमत असलेली कीट रक्त नमुने व इतर तपासणीसाठी वापरतात पण बोगस पंथीवाले व गल्लीबोळातील मुन्नाभाई केवळ १० रुपये किंमत असलेली किट वापरून तपासणी करतात.
विशेष बाब म्हणजे डॉक्टरांनी आपल्याच क्लिनिकमध्ये अथवा रुग्णालयात चालवलेल्या अनधिकृतपणे लॅबमधील रिपोर्ट खरे की खोटे, डॉक्टरांना हवे तसे या बाबतच्या उलट-सुलट चर्चा मागील सहा महिने ते वर्षापासून सुरु आहेत. मात्र योग्य ठिकाणी पाकीट पोचत असल्याने, पूर्व हवेलीमधील खासगी रुग्णालयांच्या एका मोठ्या व शाश्वत जोडधंद्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
पूर्व हवेलीमधील अनेक मुन्नाभाई पॅथॉलॉजिस्ट आपल्या लॅबमध्ये थातुरमातुर मशिनरीचा वापर करुन तपासणी करून दर आकारतात. यामुळे बोगस कीट आणि बोगस पॅथलॅबवाल्याकडुन योग्य तो तपासणी रिपोर्ट न आल्यामुळे सदर रुग्णांवर चुकीचा ऊपचार केला जातो. त्यामध्ये रुग्णांची आर्थीक पिळवणुकीसह जीवही जावू शकतो.
सध्या असेच बोगस लॅबचे प्रमाण वाढल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आहे. पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्यावर शासन होणे महत्वाचे आहे. व पूर्व हवेलीत उत्तम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित व्हावी.
यासाठी पुण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे सबंधित अधिकारी यांनी ही बाब गंभीरतेने घेवून बोगस लॅबचा गोरखधंदा हाणून पाडावा, ‘रुग्णांची होत असलेली आर्थीक लुट आणि रूझांच्या जिवाशी चाललेला खेळ त्वरीत थांबवावा. तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी पूर्व हवेलीमधुन आता जोर धरत आहे.