लोणी काळभोर : पुण्यात ऑनलाईन फसवणूक होत असल्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. ओटीपीची मागणी करुन, बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचं काम या लुटारु टोळ्या करत असतात. नागरिकांची फसवणुक करण्यासाठी नवनवीन प्रकार, युक्त्या आखल्या जातात, त्यातच आता मार्केटमध्ये आता नवीन फ्रॉड समोर आला आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात मागील एक महिन्यापासून बनावट फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचा सुळसुळाट सुरु झाला आहे. त्यामुळे नागरिकांनो, ऑनलाईन व्यवहार करताना जरा सावधगिरी बाळगा. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
या फ्रॉडमध्ये दुकानदाराकडे वस्तू मागवून गुंतवण्यास येते. व अचानक ऑनलाइन पे मशीनचे रिपीट चे बटन दाबून पेमेंट पाठविल्याचे भासविले जाते. मात्र कोणत्याही स्वरूपाचे पेमेंट पाठविण्यात येत नाही. असाच एका व्यक्तीला गंडा घालण्याचा प्रयत्न कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी नगर परिसरात घडला होता. मात्र मेडिकल चालक हुशार असल्याने त्या भामट्याचा प्रयत्न फसला आहे.
लोणी काळभोर गावात तीन अल्पवयीन मुले आहेत. त्यामधील एक मुलगा हा शाळेतील असल्याची माहिती मिळत आहे. मुलांनी बनावट फोन पे च्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. मुले नेहमीप्रमाणे लोणी काळभोर येथील एका दुकानात अशीच फसवणूक करण्यासाठी गेले होते. मात्र दुकानदाराने आपल्या बँकेच्या खात्यात पैसे न आल्याने, त्या मुलांना पकडून ठेवले. व त्यांच्या मोबाईलमध्ये पाहिले असता, बनावट फोन पे असल्याचे आढळून आले. त्यांमध्ये 50 पासून लाखांपर्यंत व्यवहार केले आहेत.
आजची मुले ही उद्याची सुज्ञ नागरिक असणार आहेत. त्यांच्या हाती देश चालवण्याची जबाबदारी असणार आहे. मात्र आता शाळेतील
व अल्पवयीन मुले असा स्कॅम करीत असतील तर हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. तसेच या मुलांनी केलेल्या फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे दुकानदारांसह नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी या प्रकारच्या फ्रॉड पासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास काय कराल?
या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी पावले उचलत आहे. फसवणूक होऊ नये यासाठी तसेच फसवणूक झाल्यास पुढे काय करावे यासाठी रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आर्थिक फसवणूक झाल्यास गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी या सूचनांचे पालन करायला हवे. फसवणूक झाल्यावर तीन दिवसांच्या आतमध्ये याविषयी बँकेला माहिती द्यावी. ४ ते ७ दिवसांमध्येदेखील फसवणुकीची माहिती बँकेला दिल्यास तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. याव्यतिरिक्त एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीने किंवा संस्थेने तुमच्या खात्यातून पैसे काढले आणि याला तुम्ही किंवा बँक जबाबदार नसेल तरीसुद्ध तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.
पैसे परत कसे मिळवाल?
रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार जर तुमचे फसवणूक झालेले पैसे देण्यास बँकेने मनाई केली तर तुम्ही खालील मार्गदर्शक सूचना पाळाव्यात
ऑनलाईन फसवणूक झाल्यास सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलिसांत याविषयी तक्रार नोंदवा. त्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन फसवणुकीची तक्रार द्यावी. त्यासोबत पोलिसांत दिलेली तक्रारदेखील जोडावी. या दोन्ही तक्रारींची सॉफ्ट कॉपी रिझर्व्ह बँकेच्या [email protected] या ईमेल आयडीवर तसेच तुमच्या बँकेच्या ईमेल आयडीवर पाठवावी. ही सर्व प्रक्रिया तुमची फसवणूक झाल्यापासून ३ दिवसांच्या आत व्हायला हवी.