अजित जगताप
सातारा : धार्मिक विधी व सणासुदीच्या काळात आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या श्रावण महिन्यात सॊमवर या वाराला अन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त वडूज येथील हेमाडपंथी काशीविश्वेश्वर मंदिरात महिला भाविकांकडून रुद्र पठण करण्यात आले.
खटाव तालुक्यातील वडूज नगरीत डझनभर मंदिरे आहेत. त्यामुळे भाविकांना देवदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. महिलावर्ग पूजा पाठ व रुद्र पठण करण्यास आघाडीवर असतात. आज यावर्षातील शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त सर्व मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. येथील तारकेश्वर मंदिरात ही श्री च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी सर्व ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.तारकेश्वर मंदिर हे निसर्गरम्य ठिकाणी असल्याने भाविक व पर्यटकांची पहिली पसंदी याठिकाणी आहे. असे सेवेकरी पदमनील कणसे, सुशांत पार्लेकर यांनी सांगितले.
वडूज येथे महाशिवरात्रीला पाच दिवस उत्सव साजरा केला जातो. येरळा नदीच्या पात्रात मूळ उगम मोळ मांजरवाडी ( डिस्कळ)झाला आहे. सांगली पर्यत अकरा स्वयंभू शिवलिंग आहेत.अशी माहिती श्री महादेव मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष : विजयकुमार माळी, सचिव-शेखर जाधव यांनी दिली.दरम्यान,गुरसाळे येथील सॊमेश्वर मंदिरातील पाच शिवलिंग व गोपूज येथील बाहुलिंग मंदिर आणि कातरखटाव येथील श्री कातरेश्वर , सिध्देवर कुरोली येथील सिध्देवर मंदिर,नागनाथवाडी येथील सॊमाईचे करंज येथील श्री महादेवाचे रूप धारण केलेल्या सॊमाई येथे ही भाविकांनी दर्शनासाठी सकाळ पासूनच गर्दी केली होती.याच दिवशी विविध ठिकाणी सुमारे अर्धा टन उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले.
दरम्यान, प्रत्येक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आल्यानंतर सढळ हस्ते दानधर्म केल्यास सर्व मंदिराचे जीर्णोद्धार होण्यास कोणतीही अडचण येणार नाही असे दान देणाऱ्या काही भाविकांनी मत व्यक्त केले.