सागर जगदाळे
भिगवण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भिगवण येथील रोटरी क्लब आणि सायकल क्लब यांच्या सहकार्याने ७५ किलोमीटर सायकलिंग करण्यात आली आहे.
या सायकलिंग मध्ये अगदी दहा वर्षाच्या मुलांपासून ते 65 वर्षांच्या वयापर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये रियाज शेख, अल्ताफ शेख, संजय खाडे, डॉ. निंबाळकर ,डॉ. मोरे , संपत बंडगर,के डी भांडवलकर,केशव भापकर, बाळासाहेब ननवरे, संदिप ताटे, डॉ. अमित खानावरे, नामदेव कुदळे, संतोष दाताळ, विशाल बंडगर, डॉ. खरड तसेच महिलांमध्ये नाझिया शेख, दिपा भोंगळे, भक्ति दोभाडा, डॉ.स्मिता खानावरे, डॉ.अस्मिता भरणे, रेखा खाडे यांनी समावेश घेतला होता.
यावेळी बोलताना रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे म्हणाले की, यावर्षी आपल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे म्हणजेच आपण यावर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने ही सायकलिंगची रॅली काढण्यात आली. यामध्ये भिगवण ते पाटस व पाटस पासून परत भिगवणपर्यंत असा रूट ठेवण्यात आला होता. तसेच प्रत्येक सदस्याला एक तिरंगा देण्यात आला जेणेकरून हरघर तिरंगा अशा दृष्टीने तो प्रत्येकाच्या घरावर लावण्यात येईल.
सायकल क्लब चे अध्यक्ष रणजीत भोंगळे म्हणाले की, सायकलिंग मुळे पर्यावरणाचा समतोल राखून,हर घर तिरंगा व अमृत महोत्सव यानिमित्ताने सर्वजण आपल्या आपल्या सायकल ला एक तिरंगा लावून त्याचा प्रसार करत सायकलिंग करत होते.
दरम्यान, पाटस मध्ये गेल्यानंतर रोटरी क्लब ऑफ पाटसचे अध्यक्ष विश्वास अवचट व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तेथे सर्व सायकल स्वारांसोबत 75 झाडे लावून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाचे नियोजन औदुंबर हुलगे, योगेश चव्हाण , प्रदीप ताटे, संजय चौधरी,डॉ.शैलेश दोशी, डॉ.विशाल कोठारी, संजय रायसोनी,किरण रायसोनी, पप्पु मुलाणी यांनी केले होते.