सुरेश घाडगे
परंडा : परंडा शहरात मराठा आरक्षण महामोर्चा दिनांक आठ नोव्हेंबर रोजी होणार आहे मराठा आरक्षण महामोर्चाच्या अनुषंगाने परंडा शहर भगवामय झाले आहे. परंडा शहरात ठीक ठिकाणी स्वागत कमानी लक्ष वेधून घेत आहेत, आरक्षणाच्या मागणीचे पोस्टर, सभेच्या ठिकाणी असलेले भव्य स्टेज, सभेच्या ठिकाणी असलेल्या मैदानात फडकणारा भगवा ध्वज,लक्ष वेधून घेत आहे.
परंडा येथील मराठा आरक्षण महामोर्चाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मुस्लिम समाज, ब्राह्मण महासंघ, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान परंडा, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, सुवर्णकार असोसिएशन, व्यापारी महासंघ, लहूजी शक्ती सेना, मेहदवी मुस्लीम समाज, काँग्रेस कमिटी, पेशवा युवा मंच, पैलवान संघ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग,नाभिक समाज संघ, मी वडार महाराष्ट्र संघटना, विविध सामाजिक संघटना ,सामाजिक संस्था यांच्या वतीने मराठा आरक्षण महामोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे.
विविध सामाजिक संघटनांकडून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व अल्पोपहाराची सोय करण्यात येणार आहे तर एक लाखाहून अधिक मराठा समाज बांधव सहकुटुंब मराठा आरक्षण महामोर्चात सहभागी होतील असा अंदाज मराठा आरक्षण महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सकल मराठा समाज आयोजित मराठा आरक्षण महामोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा आरक्षण महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे.